इतिहासाचे एक पान. १०४

मोरारजी देसाई यांना मात्र नव्यानं कांही बदल घडून येत असल्याचा सुगावा लागाल होता. अमृतसरला पंत, नेहरू, ढेबरभाई, आझाद यांची जी बैठक झाली त्या वेळीं. मोरारजीहि उपस्थित होते. पंत पंत यांनी महाराष्ट्रांतील आणइ विशेषत: मुंबईंतील वातावरण शांत करायचं, तर द्वैभाषिक प्रस्थापित करण्यासंबंधीचा विचार करावा लागेल, असं या वेळीं सांगितलं होतं. मोरारजींनी मात्र पंतांची ही सूचना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला. द्वैभाषिक जन्माला येणार असेल, तर मुख्य मंत्री या नात्यानं त्याची जबाबदारी मी घेऊं शकणार नाही असं सांगून त्यांनी सुरूवातीलाच मोडता घातला, पण त्याचबरोबर वर्किंग कमिटी आणि केंद्र-सरकारला द्वैभाषिक मान्य असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी मोरारजींनी सोडवणूक करून घेतली होती. द्वैभाषिकाचा पर्याय मी गुजरातच्या गळीं उतरवूं शकणार नाही आणि तसं घडवायचं तर त्यासाठी मला एक तर राजकीय संन्यास घेण्याची तयारी ठेवावी लागेल किंवा प्राणाची बाजी लावावी लागले, असा मोरारजींचा पवित्रा होता. बैठकींत या पातळीवर फक्त चर्चा झाली, पण निर्णय काहीच झाला नाही. दिल्लीचं वारं मात्र बदललं आहे एवढं मोरारजींना उमजण्यास ही चर्चा पुरेशी ठरली. पं. पंतांनाहि तिथे निर्णय करायचाच नव्हता, फक्त मताचा अंदाज घ्यायचा होता आणि त्या दृष्टीनं त्यांचंहि काम झालं होंतं.

अमृतसरच्या अधिवेशनांत देवगिरीकर आणि लालबहादूर शास्त्री यांच्यांत चर्चा होऊ देवगिरीकरांनी पूर्वीचाच सारा पाढा वाचला प्रदेश-काँग्रेसच्या ठरावाला अनुसरून एक टिपण करून दिलं, पण त्याचा कांही उपयोग झाला नाही. काकासाहेब गाडगीळ आणि यशवंतराव चव्हाम यांनी महराष्ट्राची बाजू कणखरपणें मांडली, तर स. का. पाटील यांनी विरोधी सूर लावला. या संपूर्ण अधिवेशनावरच राज्य-पुनर्रचना प्रश्नांची छाया पडली होती. पंजाबी सुब्यची मागणी करण्यासाठी शिखांनी दहा लाखांचा मोर्चा आणला होता. अधिवेशनांतील सा-या चर्चा आणि मोर्चाचं वातावरण पाहून पंडितजींनी त्या वेळीं भावनेला आवाहन करणारं भाषण केलं. त्यांचं भाषणमोठं हृदयस्पर्शी होतं. हें सर्व झालं तरी मूळ प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं गाडी पुढे सरकली नाही. सर्व चर्चा आणि ठराव याचा मथितार्थ एवढाच होता की, बहुभाषी राज्य-रचना करणं जिथे शक्य असेल तिथे ती निर्माण करण्याच्या दृष्टीनं लोकांना आवाहन करावं, त्यांना समजून द्यावं.

अमृतसर काँग्रसे संपवून महाराष्ट्रांत परतलेली नेते-मंडळी मग अमृतसरचा संदेश लोकांना सांगण्यासाठी दौ-यावर निघाली. महाराष्ट्रांत यशवंतरावांनी ‘अमृतसर काँग्रेसचा संदेश’ या विषयावर सांगली इथे पहिलं महत्त्वाचं भाषण केलं. समितीची चळवळ सर्वत्र सुरू होती; पण सांगलींत वसंतरावदादा पाटील यांचा कार्यकर्त्यांचा संच मोठा होता. तो तयार होता. सभा निर्वेधपणानं पार पाडण्याची त्यांची जिद्द होती. समितीच्या लोकांनीहि त्या वेलीं सांगलीच्या सभेंत व्यत्यय न आणण्याचं ठरवलं असावं. कारण चव्हाणांची ही सभा व्यवस्थित पार पडली. या सभेंत कार्यकर्त्यांना विश्वासांत घेऊन, संयुक्त महाराष्ट्राच्या प्रस्नाबाबत त्यांनी प्रदीर्घ विवेचन केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणा ही भारतीय निष्ठेची प्रेरणा आहे, ही गोष्ट प्रत्येकानं शिकण्यासारखी असून, अमृतसरला हीच शिकवण मिळाली असं त्यांनी सांगितलं.

यशवंतरावांचं सांगली येतील भाषण हें संयुक्त महराष्ट्राबद्दलचं त्यांचं सुस्पष्ट मतप्रदर्शन होतं. महाराष्ट्रभर त्यांची बदनामी सुरू करण्यांत येऊ त्यांच्या हेतूबद्दलच जो संशय व्यक्त करण्यांत आला होता, सूर्याजी पिसाळ म्हणून त्यांची संभावना केली जात होती, या सर्व प्रचाराला त्यांनी प्रमाणिकपणानं दिलेलं उत्तर म्हणजे त्यांनी सांगलीच्या सभेंत व्यक्त केलेले विचार होत.

या सभेंत त्यांनी असं स्पष्ट केलं, “मी. मुंबई महाराष्ट्राला नको असं कधीही म्हटलेलं नाही. मुंबईसाठी चळवळ नको एवढंच मी म्हणत आहे. मुंबई मिळाली नाही याचं मला दु:ख आहे. पण मुंबई मिळाली नाही म्हणून देश जाळायचा काय? काँग्रेसबाहेर या आणि झगडा करा म्हणून सांगितलं जात आहे, पण कुणाशीं झगडा करायचा? भावाशीं झगडा करायचा? झगड्यानं, वैरानं मुंबई मिळणार नाही; आणि मिळाली तरी ती मुंबई असणार नाही. ज्या श्क्तीवर आणइ निष्ठेवर मोठाले प्रश्न सोडवले त्या शक्तीनंच हा प्रश्न सुटणार नाही काय? लढ्याची भाषा बंद झाली पाहिजे. मुंबईचा प्रश्न सुटेल. निश्चितपणें सुटेल हें मीव सांगूं शकतों, पण केव्हा सुटेल याचं वेलापत्रक मी सांगूं शकत नाही.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com