महाराष्ट्रातील दुष्काळ - ६१

पहिली योजना यशस्वी झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात ही बातमी आपोआप पसरली आणि दोन वर्षाच्या कालावधीत ५१ योजना मूर्त स्वरुपात आल्या.  या योजनेस २५०० एकर एवढे क्षेत्र सिंचनाखाली आलेले असून २५,००० लोकसंख्येला त्याचा लाभ झाला आहे.  रू. ६० लाख भांडवली गुंतवणूक या योजनेत झालेली आहे.  जिराईत शेती असताना अनेक कुटुंबांना दुसरीकडे कामासाठी जावे लागत होते, तीच कुटुंबे आज दुसर्‍याला कामे उपलब्ध करून देत आहेत.  पाण्याची हमी हीच रोजगाराची खरी हमी आणि हीच रोजगार निर्मितीची खरी हमी आहे.  हे या ५१ योजनेतून सिद्ध झालेले आहे.

ह्या योजना उभ्या करण्यात प्रत्येक समूहाने आपले लोकनेतृत्व उभे केले आहे.  योजनांना तांत्रिक, आर्थिक आणि व्यवस्थापकीय मार्गदर्शन हे खळद येथे स्थापन झालेल्या 'शेतकरी विकास केंद्रा'तर्फे शेतकर्‍यांना, गट प्रमुखांना आणि पाणी वाटप सेवकांना दिले जाते.  सर्व गट प्रमुख महिन्यांत एक एक वेळ एकत्र येऊन आपल्या प्रश्नाविषयी आणि पुढील प्रगतीच्या कामाविषयी विचार विनिमय करतात.

प्रयोगाचे यश

'पाणी पंचायतीचा' हा वेगळा प्रयोग ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे.  सामूहिक नेतृत्व, शेतीवरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि कमीत कमी विज्ञान व्यवस्थापन आणि भांडवली वापरून अधिकाधिक लोकांना विकासांत सामावून घेणारी मार्गदर्शक योजना आहे.  हा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीडनच्या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या संख्येने मान्य करून ह्या जूनमध्ये पाणी पंचायतीला २ लाख २० हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान केला.  त्याप्रमाणे २२ ऑगस्टला जमनालाल बजाज पारितोषिकाचा पुरस्कार व एक लाख रुपयाचे बक्षीसही जाहीर झाले आहे.  

विनंती

हा प्रयोग महाराष्ट्रातल्या इतर भागात प्रसारित होण्यासाठी शासनाच्या संबंधित संस्थांनी नियोजनामध्ये काही अमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे.  त्याची मांडणी वेळोवेळी शासनाकडे केली आहे.  त्याबाबत जनमत जागृत करण्याची आवश्यकता आहे.  मर्यादित स्वरुपात हे काम आम्ही करीत आहोत.  आपण सर्वांनी हा प्रयोग पाहून त्यात सहभागी व्हावे एवढीच विनंती.

परिशिष्ट 'अ'
पुणे जिल्ह्यातील जलसंपत्तीचे सुधारित नियोजन

सुधारित नियोजनाचा तक्ता (तक्ता पाहण्यासाठी येथे क्ल्कि करा.)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com