विदेश दर्शन - ३८

Gypsums च्या खाणीचे काम शंभर वर्षांपूर्वी येथे सुरू झाले होते. हजारो फुटांचे भुयार होते. आत गेले म्हणजे जवळ जवळ दोन हजार माणसे काम करतील अशी विस्तीर्ण गुहा पसरलेली आहे. आत स्वच्छ पाण्याचे जणू काय कालव्यासारखे सरोवर झाले. या भुयारातील या सरोवरात छोटया बोटींनी आम्ही प्रवास केला. मला तर सर्व प्रकार लोकविलक्षण वाटला.

१९४४ साली जर्मनांनी हा देश काबीज केल्यानंतर जेट विमानांची तयारी करण्याचा कारखाना येथे काढला होता असे माहीतगार सांगत होते.

आजचा सर्व दिवस फारच मजेत गेला. या सुंदर प्रदेशाच्या विस्तीर्ण रस्त्यावरून प्रवास करीत असताना एकदम तुझी आठवण झाली. इतकी सुंदर स्थळे निव्वळ तुझ्या प्रकृतीमुळे तू पाहू शकत नाहीस याची खंत वाटते. मला वाटते तू निर्धाराने हे प्रवास करण्याची तयारी केली पाहिजेस. प्रकृतीची कथा तर नेहमीचीच आहे. मी तेथे नसलो म्हणजे त्यामुळेच एकाकीपणाचे भावनेतून तू आजारी पडतेस. त्यापेक्षा बरोबर राहून काहीसा त्रास झाला तरी त्याची तीव्रता कमीच भासेल. माझ्या पुढच्या प्रवासात तुला येण्याचा आग्रह मी करणार आहे, हे आताच कळवून ठेवतो.

उद्या आम्ही परत संध्याकाळपर्यंत डॅन्यूब नदीच्या काठी भटकंतीसाठी जाणार आहोत. आज एक १२ व्या शतकातील Monastry पाहिली. उद्याही अशीच एक Monastry पहाणार आहोत. अॅम्बॅसिडर श्री. विष्णू त्रिवेदी सहकुटुंब या प्रवासात आमच्याबरोबर राहणार आहेत. उद्या संध्याकाळी ६ वाजता स्टॉकहोमला निघणार.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com