आमचे मुख्यमंत्री -४६

14 sharad pawar
१४. श्री. शरद पवार

संयुक्त महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री

(१८-७-७८ ते १७-२-८०, २६-६-८८ते ४-३-९०, ४-३-९० ते २५-६-९१ आणि ६-३-९३ ते १४-३-९५)

श्री. शरदजी पवार हे महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री. त्यांचे वर्णन महाराष्ट्रातील स्ट्रॉंगमॅन असे करतात. राष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेले ते महाराष्ट्रातील एकमेव पुढारी आहेत असे मानले जाते. ते महाराष्ट्राचे चारदा मुख्यमंत्री होते.

जन्म व शिक्षण

शरदजींचा जन्म बारामतीजवळील काटेवाडी ह्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना पाच कर्तबगार भाऊ. त्यातील श्री. आनंदराव आता हयात नाहीत. शिक्षणाशिवाय भवितव्य नाही हे सातत्याने त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर बिंबविले.

शरदजींचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बारामतीस झाले. पुण्याच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून ते बी.कॉंम. झाले.

युवक चळवळ व लग्न

विद्यार्थी दशेत त्यांनी युवक चळवळीत सक्रिय भाग घेतला. त्यांना यशवंतराव चव्हाणांचे आशीर्वाद व प्रोत्साहन होते. त्यांचे लग्न महाराष्ट्रातील प्रसिध्द गोलंदाज श्री. सदू शिंदे यांच्या कन्येशी – प्रतिभाताईंशी झाले. एकच अपत्य असणार अशी शपथ त्याचवेळी त्यांनी घेतली होती.

राजकारणात भाग

१९६७ सालापासून त्यांना कॉंग्रेस संघटनेत महत्वाचे स्थान मिळाले. ते महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे काही काळ अध्यक्ष होते. फोरम फॉर सोशालीस्ट ॲक्शन ह्या संघटनेचे महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते.

निवडणुकीत भाग

१९६७ साली ते बारामती मतदार संघातून विधिमंडळात निवडून आले (१९६७-७२). पण मंत्रिमंडळात त्यांना १९७२ पर्यंत स्थान मिळाले नाही.

१९७२ ची निवडणूक व मंत्रिमंडळात स्थान

१९७२ साली बारामती मतदार संघातून निवडून आल्यानंतर वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. ह्यावेळी त्यांच्याकडे युवक क्रीडा, राज्यशिष्टाचार, प्रसिध्दी ही खाती होती. त्यांनी ह्यावेळी पैलवानांना शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली व महाराष्ट्र गौरव ॲवार्ड देण्यास सुरुवात केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com