यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३७

दिल्ली असेंब्लीमध्ये जाधवराव खासदार म्हणून सातारा जिल्ह्यातून निवडून गेले होते. चव्हाम तर पुढे २५-२६ वर्षे दिल्लीच्या राजकारणात तेथेच राहून राजकारण करीत होते. अर्थात जाधवरावांचे इंग्रज सरकार धार्जिणे राजकारण यशवंतरावांना मुळीच पटले नाही. म्हणून उभयतांचा संबंध आलाच नाही. पण जाधवरावांना बहुलोकसमाज विद्येत पुढे यावा से जरूर वाटत होते व त्या काळच्या मर्यादेत राहून त्यांनी प्रयत्न केला. एवढेच चव्हाणांना मान्य होते. यशवंतरावांनी स्वातंत्र्य आल्यावर शिक्षण प्रसाराच्या बाबतीत मनस्वी भर घातली. दिल्लीतील त्यांच्याशी झालेल्या संभाषणात जाधवरावांचा उल्लेख झाला. अर्थात राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव यशवंतरावांवर असल्याने जाधवरावांची प्रशस्ती – गौरव त्यांच्याकडून होणे अशक्य होते. भास्करराव यांनी विद्यावेतने वगैरे देण्याची चळवळ केली. ही बाब मात्र यशवंतरावांनी मान्य केली. रावबहादूर, रावसाहेब, जे. पी. वगैरे किताब मिळविणा-या नेमस्तांच्या प्रवाहातील भास्करराव होते. राष्ट्रीय जहालांना अर्थात नेमस्त पक्ष अमान्य होता. सांगण्याचे तात्पर्य हे की- विद्यार्थी वयात भास्करराव जाधवरावांना निवडून आणावे म्हणून यशवंतराव प्रयत्नशील राहीले. पण पुढे हे दोघे एकत्रित कधीच आले नाहीत. जाधवरावांचा चव्हाणांनी निर्देश केला आहे. म्हणूनही हे लिहावे लागले. राष्ट्रीय वृत्तीचे शिंदे व जाधवरावदेखील फारसे एकत्रित कधीच आले नाहीत. ‘शिंदे-जेधे’ यांच्या राष्ट्रीय चळवळीकडील ओढ्यासही भास्करराव जाधवरावांनी उघड पाठिंबा दिला नाही. मंत्रिमंडळात असताना त्यांना राष्ट्रीय चळवळीच्या विरोधीच पवित्रा घ्यावा लागला. बहुजन समाज शिकला पाहिजे या मुद्यावर दोघांचे एकमत होते. ग्रामीण शेतकरी वर्गातील प्रतिनिधी निवडून यावेत हा एक मुद्दा भास्कररावांच्या मागील राजकारणात होता. यादृष्टीने सुरूवात झाली होती. ब्राह्मणेतर लोक त्यांचेच प्रतिनिधी निवडून देऊ लागले. ही जी सामाजिक जागृती झाली ती यशवंतराव व त्यांच्या पक्षातील उमेदवारांना पुढे प्रत्यक्ष निवडून येण्यास सहाय्यक झाली. प्रचार उघड न करताही काँग्रेसतर्फे का आशंका निर्माण झाल्या व ते ब्राह्मणेतर चळवळीपासून दूर झाले. ते वेगळे ठिकाण व वेगळी माणसे शोधू लागेल. ही क्रांती होती.

चव्हाणांचे निवासस्थान क-हाडातील सोमवार पेठ या टिळकाभिमानी ब्राह्मणी वस्तीस लागून होते. लोकमान्यांविषयी आदर असणा-या टिळक हायस्कूलमध्ये चव्हाण शिकले. सामाजिक स्वातंत्र्यापेक्षा राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे असा त्यांचा विचारपिंड तयार झाला. मात्र समाजिक स्वातंत्र्याला चव्हाणांचा विरोध नव्हता.

यशवंतरावा व प्रस्तृत लेखक समवयस्क. परंतु वाईसारखा क्षेत्रस्थ ब्राह्मण्यावर असा जोरदार झालेला जवळकरी हल्ला ब्राह्मणेतरांना हवा होता. जवळकरांविषयी माझे मत वाईट झाले नाही. हा फरक होय.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com