यशवंत चिंतनिका ३५

सत्तेचे राजकारण

मला वाटते की, राजकारण आणि राजकीय नेतृत्व हा लोकव्यवहार आहे. त्यात सत्ता मिळविण्यासाठी स्पर्धा ही चालणार आहे. प्रभावी पुढारी आपल्या विचारसरणीचे, आपल्या कार्यक्रमाचा आग्रह धरणारे गट करणार, हेही आता उघड आहे. सेत्ता मिळविणे किंवा तिची अभिलाषा धरणे म्हणजे काही तरी पाप आहे, असे मानणारे लोक राजकारण करू शकणार नाहीत. कोणता तरी गट अडचणीत सापडला, की दुसरा गट पुढे येणार. सत्तासंक्रमण हे आता असेच होत राहणार. म्हणून ‘गटबाजीचे राजकारण’ इत्यादी शब्द छदमी अर्थाने आपण वापरतो, ते आता सोडून द्यावे लागेल. जगात सर्वत्र असेच चालले आहे. त्याला अपवाद आढळणार नाही. अर्थात वैयक्तिक हेव्यादाव्यांसाठी उभारलेले गट निंद्य व त्याज्यच समजावे लागतील.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com