यशवंत चिंतनिका ४१

खरा नेता

खरे म्हणजे लोकांना योग्य त-हेने, योग्य ठिकाणी नेतो, तो नेता. उदात्त उदाहरण घालून देणे, प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करणे म्हणजे नेतृत्व करणे होय. कोणत्याही समस्येत नेता हा अग्रभागी असावा लागतो. त्याला सर्वांच्या पुढे राहावे लागते. समस्या निर्माण करण्यासाठी आणि निर्माण झाल्यावर सर्वांच्या अगोदर त्याला तेथे पोहोचावे लागते. पोहोचल्यावर अखेरपर्यंत थांबावे लागते. नेता असणा-याला, नेतृत्व करणा-याला सर्वांच्या अग्रभागी, शिरोभागी राहावे लागते, पण ते श्रेणीने-सर्वांच्या शिरोभागी म्हणजे प्रत्यक्ष डोक्यावर नव्हे. तसा तो डोक्यावर बसून राहिला, तर त्याला ज्यांचे नेतृत्व करावयाचे आहे, त्यांच्या भावना, आशा-आकांक्षा स्वभावत:च तो पायदळी तुडवू लागतो. असे घडले म्हणजे त्या नेत्याबद्दलचा, नेतृत्वाबद्दलचा आदर संपुष्टात येतो, इतकेच नव्हे, तर ते नेतृत्वही संपुष्टात येते. ज्याला नेतृत्व करावयाचे आहे, त्याने अशी काही पथ्ये पाळली पाहिजेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com