व्याख्यानमाला-१९७५-१७

व्याख्यान तिसरे - दिनांक : १४-३-१९७५

विषय - "सद्यःस्थिती"

व्याख्याते - डॉ. प्रभाकर चिंतामण शेजवळकर, संचालक, इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, पुणे.

व्याख्याता परिचय -

जन्मस्थळ : सोनेगांव, जि. वर्धा, (विदर्भ)

जन्मदिनांक : १५ जानेवारी १९२९

शिक्षण : एम्. कॉम्. पर्यंतचे मुंबईत, आणि अर्थशास्त्रातील पी एच्. डी. पुणे येथे.

महाविद्यालयीन अध्यापन १९५३ पासून सुरू. १९६१ मध्ये डोक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये आजीव सदस्यत्व मिळाले. आणि बृहनमहाराष्ट्र कॉलेजमध्ये उप-प्राचार्य म्हणून काम करण्यास सुरुवात. पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेचे डीन आणि वाणिज्य अभ्यासक्रम मंडळाचे १० वर्षे अध्यक्ष.

गेली पांच वर्षे व्यवस्थापन शिक्षण वर्गांचे संचालक आणि गेल्या वर्षांपासून नविन काढलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ या संस्थेचे प्राचार्य. उद्योग, व्यापारी, सरकारी आणि विनसरकारी अशा अनेक संस्थामध्ये पदाधिकारी व सहकारी.

लेख : १२ पुस्तके प्रकाशित.

१५ वर्षे पी एच्. डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि २१ विद्यार्थ्यांना पी एच्. डी. ची पदवी मार्गदर्शनाखाली मिळाली.

सध्याची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती ही इतकी गुंतागुंतीची झाली आहे की त्याचा योग्य अन्वयार्थ लावून त्यातून समाज प्रबोधनची नवी दिशा सामान्य माणसासमोर विचारार्थ मांडणे हे अतिशय आवश्यक होऊन बसले आहे. गेल्या २५ वर्षांत आपण पुष्कळ मिळविले आणि पुढील कांही वर्षांत आपल्याला नवसमाज निर्माण करायचा आहे. सुदैवाने आपला इतिहासकाळ उज्ज्वल आहे. आफली परंपरा मोठी आहे आपली जागतिक प्रतिष्ठा ही देखील वैभवाच्या शिखरावर आहे, परंतु गेल्या कांही वर्षांत अनेक आर्थिक अडचणीमुळे संत्रस्त झाल्यासारखे दिसत आहोत. आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या एकसंघ राष्ट्राची अस्मिता नाहिशी करावी असे आपल्या देशाच्या हितशत्रूंना वाटत आहे. आणि म्हणूनच सध्या आपण एका मोठ्या कठीण प्रसंगातून जात आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी सद्यः परिस्थितीचे वस्तुनिष्ठपणे व राजकीय भूमिका बाजूला ठेवून विश्लेषण करणे आवश्यक आहे. डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी आपल्या देशातील सध्याच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचे आपल्या व्याख्यानात पृथःकरण केले आहे. आणि सध्याच्या परिस्थितीवर कांही दूरगामी स्वरुपाचे उपाय सुचविले आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com