पंढरीच्या वारक-याला जागा करून चंद्रभागेच्या वाळवंटावर जातभेद काही नाही असेच जणू घोषित करीत भागवत धर्माचा झेंडा उभा राहिला. माझ्या कल्पनेत तो सुधारणेचा झेंडा होता. आजही मी पंढरपूरच्या मंदिरात जातो तेव्हा याच भावनेने जातो. चंद्रभागेच्या वाळवंटावर महाराष्ट्रातल्या खेडयापाडयातला ब्राम्हण, मराठा, माळी, न्हावी, भंगी, कुंभार, सुतार, महार- मी हे वेगवेगळे जातीवाचक शब्द वापरतो; त्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणून वापरतो मला त्याची काही हौस नाही-हे सगळे तेथे एका मेळाव्यामध्ये आले आणि त्यांनी पंढरीचा झेंडा, भागवत धर्माचा झेंडा उभा केला. त्यामध्ये जसे तुकाराम झाले, नामदेव झाले, रामदास झाले, ज्ञानेश्वर झाले, तसेच चोखामेळा, गोरा कुंभार आणि सावता माळी हेही झाले. खरे म्हणजे सामाजिक क्रांतीच व्हावयास पाहिजे होती अशा वेळी.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com